विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली धानोरकर कुटुंबीयांची भेट #chandrapur #warora

Bhairav Diwase
वरोरा:- विरोधी पक्षनेते चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे शनिवारी वरोरा निवासस्थानी भेट दिली. यावेळी दिवंगत खासदार बाळु धानोरकर यांना श्रदधांजली वाहिली. आमदार प्रतिभा धानोरकर यांची सांत्वन केले.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे 30 मे ला पहाटे आजाराने निधन झाले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वरोरा येथे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या कुटुंबियांची शनिवारी भेट घेतली. अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील वरोरा येथे धानोरकर यांच्या निवासस्थानी पोहचले. दिवंगत बाळू धानोरकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करीत दोन्ही नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. नंतर धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेत सांत्वन केले. दोन्ही नेत्यांनी धानोरकर यांच्या अकाली निधनावर दुःख व्यक्त केले. श्रीमती धानोरकर यांना धीर दिला.