वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आकाशवाणीवरुन ५ जून रोजी साधणार संवाद #chandrapur

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे ५ जून, २०२३ रोजी सकाळी ८.४० वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन 'वनवार्ता' या कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत. "वनवार्ता"या कार्यक्रमातून वनमंत्री मुनगंटीवार हे वनांविषयी कुतूहल, गमतीजमती, रंजक गोष्टींपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या पर्यावरण विषयक चर्चा व महत्वाच्या बाबी, त्यावरील उपाय, मानव-वन्यजीव संघर्ष, वन्यजीव पर्यटन, हरित सेना (इको क्लब), वृक्ष लागवडी संदर्भात मनोगत व्यक्त करणार आहेत. ५ जून, २०२३ रोजी सकाळी ८.४० वाजता जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी वनवार्ता या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून हा कार्यक्रम १५ मिनिटांचा असेल.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)