रेल्वेमंत्र्यांची मोठी मदत जाहीर! Railway Minister's big help announced!
personBhairav Diwase
शनिवार, जून ०३, २०२३
0
share
मृतांच्या नातेवाईकांना १० लाख, गंभीर जखमींना २ लाख
ओडिशातील बालासोर येथे (शुक्रवार) संध्याकाळी एक मोठा रेल्वे अपघात झाला. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस (१२८४१) आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ५० जणांचा मृत्यू झाला. याशिवाय अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे.
मालगाडीला धडकून कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
रेल्वेची टक्कर इतकी जोरदार होती की कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली. यामुळे एकूण १७ ते १८ डबे रुळावरून घसरले आहेत. दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैश्वन यांनी मोठी मदत जारी केली आहे.
मोठी अपडेट! अपघात दोन नाही तर तीन ट्रेनचा, 50 पेक्षा जास्त मृत्यू
ओडिशातील या दुर्दैवी रेल्वे अपघातातील मृत प्रवाशांच्या कुटुंबीयांसाठी आणि जखमींसाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी मदत जारी केली आहे. या अपघातात मृत्यू झाल्यास १० लाख रुपये, गंभीर जखमींसाठी २ लाख आणि किरकोळ जखमींसाठी ५० हजार रुपये मदत सरकारने जाहीर केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्या अंदाजे २०० प्रवाशांना सोरो सीएचसी, गोपाळपूर सीएचसी आणि खंटापाडा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. याशिवाय ३२ जणांची एनडीआरएफ टीम बचावासाठी पाठवण्यात आली आहे.
दुसरीकडे, ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितले की लोकांना नेण्यासाठी सुमारे ५० रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत, परंतु जखमींची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बसेस बोलावण्यात आल्या आहेत