कोरोमंडल एक्सप्रेस अपघातातील मृतांचा आकडा 233वर, 900हून अधिक जण जखमी c Coromandel Express crash death toll at 233, over 900 injured

तमिळनाडूची राजधानी चेन्नई येथून पश्चिम बंगालमधील कोलकात्यानजिकच्या हावडा रेल्वे स्थानकापर्यंत धावणारी कोरोमंडल एक्सप्रेस एका मालगाडीला धडकल्याची घटना शुक्रवारी (2 जून) सायंकाळी घडली.

दरम्यान अपघातानंतर कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे घसरून बाजूने येणाऱ्या यशवंतपूर हावडा एक्सप्रेसला धडकले. अशा प्रकारे एकूण तीन रेल्वेंची एकमेकांना धडक बसून झालेल्या या विचित्र अपघातात मोठी जिवितहानी झाली आहे.

शनिवारी (3 जून) सकाळी सहा वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 233 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर जवळच्या गोपालपूर आणि बालासोर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ANI जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीतीसुद्धा व्यक्त करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी पोहोचले आहेत.

बचावकार्यासाठी पथकं घटनास्थळाकडे रवाना झाल्याची माहिती स्पेशल रिलीफ कमिशनर ऑफिसने दिली. बालासोरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही बचावकार्याच्या दृष्टीने आवश्यक आदेश जारी केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या