तालुक्यात वीज पडून 2 जागीच ठार तर 1 जखमी #chandrapur #sindewahi

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील ग्रामीण भागात रोवणीचा हंगाम सुरु असून शेतात महिला वर्ग रोवणीला जात असतात.आणि रोवणीला सद्या पावसामुळे वेग आला आहे. आज दि.26 जुलै 2023 ला मूसळधार पाऊस आणि विज गर्जना सह पाऊस झाला. त्यामधे सिंदेवाही तालुक्यातील देलनवाड़ी शेत-शिवरात वीज पडून 2 महिला ठार आणि एक महिला जख्मी झाल्याची घटना 4:00 वाजता घडली.

कल्पना प्रकाश झोड़े रा. देलनवाड़ी, अंजना पुस्तोड़े रा.देलनवाड़ी , असे मृताचे नाव आहे. आणि सुनीता सुरेश आनंदे ही महिला जखमी आहे.

प्राप्त माहितीनुसार सदर घटनेची माहिती महसूल विभाग तसेच पोलीस विभाग यांना माहिती देण्यात आली असुन घटना स्थळी अधिकारी वर्ग पोहचले व घटनेचा पंचनामा करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या