चंद्रपूरसह गडचिरोलीला बसणार बँक वाॅटरचा फटका
चंद्रपूर:- गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून सुमारे 1 लाख 31 हजार 881 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.
मागील तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सतत धो धो कोसळणा-या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले तुडूंब भरले आहेत. गोसे धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी पुन्हा गोसे धरणाचे संपूर्ण 33 वक्रदार यावर्षी पहिल्यांदाच उघडण्यात आली आहेत.
या 33 दरवाज्यातून 1 लाख 31 हजार 881 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान याचा फटका लगतच्या चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत