(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, वैधकिय, तसेच भौगोलिक परिस्थिती गौण खनिज, दळणवळणाच्या सोयी, तसेच जिल्ह्याच्या शासकीय इमारतीची पूर्तता करणाऱ्या अनेक शासकीय वास्तू अस्तित्वात असून सुद्धा 1982 पासून ब्रह्मपुरी जिल्ह्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरी कर 41 वर्षापर्यंत आंदोलन करीत आहे मात्र आज तागायत ब्रह्मपुरीकरच्या जिल्ह्याच्या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केले. जिल्ह्याच्या मागणीसाठी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा ,ब्रम्हपुरी बंद,धरणे आंदोलन करण्यात आले.याच आंदोलनाचा भाग म्हणून ब्रम्हपुरी जिल्हा झालाच पाहिजे व चिमूर येथील उप जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण करून त्यात ब्रम्हपुरीचा समावेश करू नये या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या दिनांक २४ जुलै २०२३ ला स्थानिक छञपती शिवाजी महाराज चौक ब्रम्हपुरी येथे सकाळी ११ ते २.०० वाजता सामूहिक मुंडण आंदोलन होत आहे या आंदोलनात ब्रम्हपुरी करानी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन शासनाचे लक्ष वेधू द्यावा असे आवाहन ब्रम्हपुरी जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत आहे.