पूर्वशा डोहेच्या मारेकऱ्यांना राजुरा पोलिसांनी केली अटक #Chandrapurpolice #rajura #chandrapur

Bhairav Diwase
1


राजुरा:- राजुरा येथे अज्ञात इसमाने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात भाजयुमो नेते सचिन डोहे ह्यांची पत्नी पूर्वशा हीचा जागीच मृत्यू झाला असुन अन्य एका व्यक्तीच्या पाठीला गोळी लागल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार सोमनाथपूर वॉर्ड येथे राहणाऱ्या लल्ली नामक व्यक्तीला वैयक्तिक शत्रुत्वातून मारण्यासाठी अज्ञात व्यक्ती शहरात आले होते. ही बाब लल्ली ह्यांच्या लक्षात येताच तो रात्री 8 ते 8:30 च्या दरम्यान भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे ह्यांच्या घरात शिरला. तेव्हा मागावर असलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. नेमक्या त्याच वेळी पूर्वशा डोहे अंगणात आल्याने त्यांना छातीत गोळी लागून त्या जागीच कोसळल्या तर लल्लीच्या पाठीला गोळी लागली.

घटना लक्षात येताच घरातील मंडळींनी शेजाऱ्यांच्या मदतीने दोघानाही तत्काळ उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्वशा डोहे ह्यांना मृत घोषित केले तर गंभीर जखमी असलेल्या लल्ली ह्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले. घटनेच्या वेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे आपले का माजी नगरसेवक राजेंद्र डोहे ह्यांचेसह बाहेर गेले होते.

पूर्वशा डोहेच्या मारेकऱ्यांना राजुरा पोलिसांनी अटक केली आहे .आरोपी लबज्योत सिंह दहेल व दुसरा आरोपी अल्पवयीन असून दोन्ही आरोपींवर भादंवी च्या कलम 302, 307, 34 व अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 3/25 अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.

हि कारवाई पोलीस अधीक्षक परदेशी, परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नागरगोजे ह्यांच्या मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी ह्यांचे नेतृत्वातील डी बी पथकाने केली.

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

  1. प्रशासनाने खोलवर तपास करून ते काडतूस कुठून आणि कसे आले ह्यांचा तपास करायला हवा. गोळीबार चे प्रकरणे राजुरा चंद्रपूर भागात वाढल्याने. पोलिस प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत. ह्यावरून जनतेचे स्वातंत्र्य धोक्यात असल्याचे स्पष्ट होते.

    उत्तर द्याहटवा
टिप्पणी पोस्ट करा