विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन भाजयुमो चे पदाधिकारी पोहोचले विद्यापीठात #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase
0

काय म्हणाले गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.‌ बोकारे?

चंद्रपूर:- भारतीय जनता युवा मोर्चा बूथ स्तरापासून तर राष्ट्रीय स्तरापर्यंत युवकांच्या, विद्यार्थ्यांच्या, समाजाच्या समस्या पुढे आणून सोडवून युवकांच्या मनामध्ये राष्ट्रहिताचा विचार रुजवून संघटित करायचे काम गेल्या अनेक वर्षापासून करत आहे.


विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन भाजयुमो चे पदाधिकारी पोहोचले विद्यापीठात


गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी 2023 परीक्षेचे निकाल येण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही अभ्यासक्रमाचे निकाल आले आहे, त्यातून अनेक विद्यार्थ्यांचा असं म्हणणं पडत आहे की निकालांमध्ये चुकीचे मुल्यांकन करण्यात आले आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेमध्ये शून्य ते पाच असे गुण देण्यात आले आहेत आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचा वातावरण निर्माण झाले आहे. त्यामध्ये जनता कॉलेज चंद्रपूर, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, हायटेक फार्मसी कॉलेज तसेच चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक कॉलेजातील विद्यार्थ्यांना समावेश आहे. पुढील शिक्षणापासून विद्यार्थी वंचित होऊ नये. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजयुमो महानगर पदाधिकारी गोंडवाना विद्यापीठ पोहोचले. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बोकारे यांच्यासोबत भाजयुमो महानगर पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली आणि निवेदन दिले.

काय म्हणाले गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.‌ बोकारे?


विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले की, आक्षेप असलेल्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका पाहण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना आमंत्रित केले जाईल. विद्यार्थी समाधानी नसल्यास तज्ज्ञांच्या माध्यमातून १०% उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जर १०% उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनात त्रुटी आढळल्यास विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिका निःशुल्क तपासण्यात येतील. तसेच याबद्दलची पुढील माहिती परीक्षा व मूल्यमापन विभागाची बैठक घेऊन माहिती दिली जाणार आहे. तसेच पुढील शिक्षणापासून विद्यार्थी वंचित होऊ नये याकरिता नापास विद्यार्थ्याची परिक्षा लवकरच घेऊन निकाल लावण्यात येईल. असे आश्वासन यावेळी दिले.

भाजयुमो चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य व भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष यश बांगडे, पप्पू बोपचे, राहुल पाल, मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार, सचिव मनीष पिपरे, भैरव दिवसे, शिवम सिंह, अमोल चौधरी, राहुल पाल उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)