पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून आले पालकमंत्री मुनगंटीवार #chandrapur #ballarpur

Bhairav Diwase
0

आशिष देवतळे यांच्या मागणीला यश

बल्लारपूर:- दि. 11 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना केली. कारण बल्लारपूर शहरातील रेल्वेच्या जवळील परिसरात अनेक वर्षापासून मोठा गरीब वर्ग घर बांधून राहत आहे या नागरिकांना काही दिवसांपूर्वी तुम्ही रेल्वेच्या जागेवर घर बांधून आहात जर तुमच्याकडे जागेचे कागद पत्र असेल तर नागपूर कार्यालयात येऊन दाखवा अन्यथा घर खाली करण्याचे नोटीस पाठवण्यात आले यामध्ये रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करून राहिलेल्या लोकांची संख्या तर आहेच परंतु सोबतच नजूलच्या जागेवर आणि ज्या लोकांच्या घरांचे पट्टे आहे अशांना सुद्धा रेल्वेची नोटीस आली यावर या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिनांक 11 तारखेला या विषयाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक घेण्याचे आदेश दिले.

त्या अनुषंगाने SDO कार्यालय बल्लारपूर येथे तहसीलदार, मुख्याधिकारी, रेल्वेचे अधिकारी, भुमिअभिलेख कार्यालयाचे अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी तसेच भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली त्यानंतर सुधीर भाऊंना या विषयाची माहिती देण्यात आली व सांगण्यात आले की जवळपास शंभर पेक्षा जास्त लोकांना 14 जुलै ला नागपूर येथे बोलवण्यात आले आहे. नोटीस आलेले लोक सर्वसामान्य गरीब कुटुंबातले असल्यामुळे आणि मोठ्या संख्येत मजूर वर्ग असल्यामुळे त्यांना नागपूरला जाणे हे अवघड होते त्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांनी बल्लारपुरला येऊन कागदपत्र स्वीकारावे अशी मागणी नागरिकांच्या माध्यमातून आशिष देवतळे यांनी सुधीरभाऊंना करताच सुधीर भाऊंनी रेल्वेच्या प्रमुख अधिकाऱ्यांना निर्देश दिले व संबंधित नागरिकांचे कागदपत्र हे बल्लारपूर येथे आपण स्वीकारावे व संबंधित बैठक हे बल्लारपुरला घ्यावी असे निर्देश दिले त्यानंतर आज दिनांक 12 तारखेला या विषयाची अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मान्यता देऊन 14 तारखेला नागपूरला होणारी बैठक ही बल्लारपूर शहरातच होणार स्पष्ट झाले. यावर संबंधित नागरिकांनी सुधीर भाऊंचे आभार मानले व यामध्ये भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्याबद्दल त्यांच्या पाठपुराव्याला एक मोठा यश प्राप्त झाला असे दिसून येते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)