शेतात पडलेले विद्युत पोल पुर्ववत उभे करण्यास अडथळा निर्माण करण्याच्या कारणावरून शेतकरी धडकले तहसीलवर #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
0

पोंभूर्णा:- जून महिण्याच्या सुरूवातीला आलेल्या चक्रीवादळ व पावसामुळे मौजा चेक ठाणेवासना शेत शिवारातील जवळपास ४० विद्युत पोल मोडून पडल्यामुळे ठाणेवासना येथील संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंपाचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्याअनुषंगाने पोल उपलब्ध करुन देण्यास मागणी करण्यात आली होती त्यानुसार म.रा. वि.वि. कंपनीने पुरेसे विद्युत पोल उपलब्ध करुन दिले होते मात्र सर्व्हे नंबर २४९ मधील शेतकऱ्यांना पोल उभे करण्यास मज्जाव केल्याने पिडीत शेतकऱ्यांनी तहसिलदार यांचेकडे धाव घेत यावर उपाययोजना करण्याची मागणी निवेदनातून केली असून तात्काळ पोल उभे झाले नाही तर शेतकरी आपल्या कुटुंबासह आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

जून महिण्याच्या सुरूवातीला आलेल्या चक्रीवादळ व पावसामुळे मौजा चेक ठाणेवासना शेत शिवारातील जवळपास ४० विद्युत पोल मोडून पडल्यामुळे ठाणेवासना येथील संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंपाचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.सर्व शेतकऱ्यांची शेती ही विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहे.या भागात धरण किंवा तलावे नाहीत. त्यामुळे विद्युत पुरवठा झाला नाही तर शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान होणार आहे. यामुळे शेतकरी पिकाविना,बँकेचे कर्ज,मुलींचे लग्न,मुलांचे शिक्षण, म्हाताऱ्या आई-वडीलांचे पालनपोषण,लोकांची जुनी देणी-घेणी या सर्व गोष्टी पूर्ण करणे शक्य होणार नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात पडलेले विद्युत पोल उभे करण्याकरीता म.रा.वि.वि. कंपनीने पोल व मजुर पाठविले होते मात्र सर्व्हे नं. २४९ चे शेतमालक किसन ढुमणे यांनी पोल उभे करण्याकरीता सदर कंत्राटदाराच्या मजुरांना दम देऊन काम बंद पाडले असल्याचे निवेदनात सांगितले आहे.
यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.त्यामुळे प्रशासन, विद्युत वितरण कंपनी व गैरअर्जदार यांचे विरोधात १४ जुलैला पिडीत शेतकरी आपल्या कुटुंबासह आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)