नगर पंचायत पोंभुर्णा कडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार #chandrapur#pombhurna

Bhairav Diwase
0
पोंभुर्णा:- नगर पंचायत पोंभुर्णाच्या वतीने शहरातील शाळा, महाविद्यालय मधून विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा नागरी सत्कार सोहळा दिनांक १० जुलैला पार पडला.

दरवर्षी प्रमाणे नगरपंचायत कडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. विद्यार्थ्यांना आणखी चांगला अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळावे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात मदत व्हावी, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. या हेतूने हा कार्यक्रम दरवर्षी नगरपंचायत कडून साजरा करण्यात येतो.

आपल्याला किती टक्के गुण मिळाले याला फारसे महत्त्व राहिले नाही परंतु विद्यार्थी आपल्या आयुष्यात, भविष्यात काय करू इच्छितो, त्याच्या आवडीचे कोणते क्षेत्र आहे. याकडे लक्ष दिले पाहिजे, मिळविलेल्या डीग्रीपेक्षा मिळविलेले ज्ञान हे जन्मभर उपयुक्त असते आपण मिळविलेले गुण ते सद्गुण कसे करता येईल याचं प्रयत्न आपण केले पाहिजे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण आपल्या आयुष्याचं सोनं करावं असे मोलाचे मार्गदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटक नगर पंचायत च्या नगराध्यक्ष सुलभा गुरुदास पिपरे यांनी संबोधित केले.

शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापती आकाशीत गेडाम यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देत यापुढेही यशाची मोठमोठी शिखर पादाक्रांत करून शहराच नाव रोशन करा. असे मत व्यक्त केले.

यावेळी जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय पोंभुर्णा M.C.V.C. इयता 12 वी. चिंतामणी महाविद्यालय, श्रीकृष्ण विज्ञान महाविद्यालय तसेच डायमंड ज्युबिली कॉन्व्हेन्ट चे असे एकूण 19 गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी नगर पंचायत चे उपाध्यक्ष अजित मंगळगिरिवार, मुख्यधिकारी आशिष घोडे, सभापती श्वेता वनकर, सभापती रोहिनी ढोले, उपसभापती उषा गोरतंवार, नगरसेवक लक्ष्मण कोडापे, दर्शन गोरांटिवार, शारदा गुरूनुले, रीना उराडे, महेश रणदिवे तसेच सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशांत आमटे सूत्रसंचालन रोशन येमुलवार व आभार प्रदर्शन कपिल भापकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)