आ. अबू आझमी यांच्या वक्तव्याविरोधात शहर भाजपच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन #chandrapur #ballarpur


बल्लारपूर:- समाजवादी पक्षाचे एकमेव आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत "वंदे मातरम्" न बोलण्याबाबत केलेल्या वक्तव्याला मनाई केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी बल्लारपूर वतीने गुरुवार दिनांक 20/07/2023 रोजी सायंकाळी 5 वाजता नगरपरिषद चौक बल्लारपूर येथे जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल बल्लारपूर विधानसभा प्रमुख व हरीश शर्मा जिल्हाध्यक्ष भाजपा चंद्रपूर (ग्रामीण) यांच्या प्रमुख उपस्थितीत तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे सर्व नेते व कार्यकर्त्यांनी अबू आझमी हाय हायच्या घोषणा दिल्या

तीव्र निषेध आंदोलनात शहर भाजप अध्यक्ष काशिनाथ सिंह, सरचिटणीस मनीष पांडे, देवेंद्र वाटकर, सतीश कनकम, सारिका कनकम, घनश्याम बुरडकर, सतविंदर दारी, किशोर मोहुर्ले, सुधाकर पारधी, प्रतीक, संध्या मिश्रा यांच्यासह महिला भाजप, भाजयुमोचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत