जागतिक व्याघ्रदिनी चंद्रपूर जिल्ह्यात वाघिणीचा मृत्यू #chandrapur #ballarpur

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- जागतिक व्याघ्रदिनी बल्लारशाह वन परिक्षेत्रांतर्गत येणार्‍या नियक्षेत्र कळमना कक्ष क्रमांक 572 मधील सामाजिक वनिकरण रोपवाटीकालगतच्या कुकुडरांझी झुडपात शनिवार, 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता वाघीण मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली.

वनविभागाला याबाबत माहिती कळताच, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदण पोडचेलवार यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी परिसराची पाहणी केली असता झुडपात वाघीण मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी नियतक्षेत्र कळमना अंतर्गत प्राथमिक वन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या वाघिणीचे सर्व अवयव शाबुत असून, वय अंदाजे वय 4 वर्ष आहे. वनाधिकार्‍यांनी मोका पंचनामा करून वाघिणीचा मृतदेह ताब्यात घेतला व विच्छेदनासाठी चंद्रपूर येथील ट्रांझीट ट्रिटमेंट सेंटर येथे पाठविण्यात आला. वाघिणीच्या मृत्यूचे खरे कारण उत्तरिय तपासणी नंतरच स्पष्ट होणार असल्याचे वनाधिकार्‍यांनी सांगितले.

या प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वनविभाग चंद्रपूरच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे करीत आहे. तर तपासाकरिता कळमना क्षेत्र सहायक भगीरथ पुरी व वनरक्षक कळमना यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)