पिपरी देशमुख गावाला जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट #chandrapur #bhadrawati

Bhairav Diwase
0
गावातील समस्यांचा घेतला आढावा

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- गेल्या वर्षी पूरस्थितीचा फटका बसलेल्या तालुक्यातील पिपरी देशमुख गावाला जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भेट देऊन गावातील समस्यांचा आढावा घेतला. या दौऱ्या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी चारगाव व बेलसणी या गावाला सुद्धा भेट दिली. 

यावेळी वेकोलीचे अधिकारी, भद्रावतीचे तहसीलदार अनिकेत सोनवणे, कृषी विभागाचे अधिकारी, भद्रावती पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी, भाजपा नेते नामदेव डाहुले आदी उपस्थित होते. 

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गावचे सरपंच अर्चना नांदे व ग्रामपंचायत सदस्य संदीप खुटेमाटे यांच्याशी संवाद साधला.या दोघांनी गावातील समस्या त्यांच्यासमोर मांडली व पुर परिस्थिती निर्माण होण्याच्या कारणांविषयी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.या दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी वर्धा नदीकिनारी जाऊन वेकोलीने टाकलेल्या ओव्हर बर्डनच्या ढिगार्‍यांची सुद्धा पाहणी केली.गेल्या वर्षी पिपरी देशमुख गावात चारदा पूर आला होता. या पुरामुळे गावकऱ्यांच्या पाळीव जनावरांचे, घरांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या परिस्थितीतून गावकरी अद्यापही सावरले नसताना यावर्षी पावसाळा सुरू झाल्याने गावातील गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. केवळ आश्वासन देण्याऐवजी अशी स्थिती निर्माण होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)