गवराळा येथे भाजपाची टिफीन बैठक संपन्न

Bhairav Diwase
0

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- महा-जनसंपर्क अभिमानाच्या पार्श्वभूमीवर ' संपर्क से समर्थन' अंतर्गत गवराळा येथील गणपती मंदिराच्या आवारात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत गुंडावार आणि वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रमेश राजुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच टिफीन बैठक संपन्न झाली.
      यावेळी मंडळातील भाजपा पक्षातील जेष्ठ नेते, प्रमुख पदाधिकारी, युवा मोर्चा कार्यकर्ते व इतर नागरीकांसोबत सामूहिक चर्चा करण्यात आली. तसेच पक्ष संघटनात्मक परिपूर्ण चर्चा विनिमय झाले. बुथ बांधणी करिता नियोजत्माक चर्चा घडून आली. प्रत्येक कार्यकत्याचे वयक्तिक मत घेण्यात आले. तसेच ९०९०९०२०२४ या क्रमांकावर वर मिस कॉल देऊन मोदी सरकारला समर्थन मागीतलं व ७८२००७८२०० या क्रमांकावर मिस कॉल देऊन सरल ॲप डाऊनलोड करण्यात आले. सदर बैठकीत त्यांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचे पत्रकं देत अन्य महत्वपूर्ण कामगीरीसंदर्भातही सकारात्मक चर्चा करण्यात आली.

       सदर कार्यक्रमाला भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमित गुंडावार, जिल्हा महामंत्री इम्रान खान, माधव बांगडे, सुनील नामोजवार, चेतन गुंडावार, पांढरे गुरुजी, संतोष आमने, गोपाळराव ठेंगणे, मधुकर सावनकर, श्रीपाद बाकरे, पुनेश्वर विरूरकर, गोविंदा बिंजवे, अनंता ताठे, पंढरीनाथ पिंपळकर, निशांत देवगडे, संजय रॉय, वंदना सिन्हा, रक्षिताताई निरंजणे, तोशिब शेख, संदिप पाचभाई, अमनसिंग, गोपाल गोसवाडे, राजुरकर गुरुजी, गुंडावार गुरुजी, अनिल ढेंगळे, पवन हुरकट, कुटेमाटे यांच्या सह काही जेष्ठ नेते, प्रमुख पदाधिकारी, महिला मोर्चा, युवा मोर्चा कार्यकर्ते व इतर नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)