“झाडें लावा, झाडे जगवा” चा दिला संदेश
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सामाजिक वनीकरण परीक्षेत्र अंतर्गत सिंदेवाही ते लाडबोरी मार्गाच्या कडेला दुतर्फा वृक्ष लागवड करण्याबाबत नियोजन करण्यात आले होते.ते नियोजन प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी सामाजिक वनीकरण परीक्षेत्र सिंदेवाही यांनी पावसाळा सुरु होताच तत्परता दर्शविली.तसेच वृक्षांची लागवड करण्यात आली.मानवी जीवनात वृक्षाचे महत्व काय आहे.याबाबतीत विद्यार्थ्यांना माहिती असावी यासाठी वृक्ष लागवड करताना वृक्ष लागवडी बाबत सामाजिक वनीकरण चे वनपरीक्षेत्र अधिकारी श्री एम बी गायकवाड यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,लाडबोरी येथील शिक्षक वृंद तथा विध्यार्थ्यांना आमंत्रित करून वृक्ष लागवड व मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला.
या कार्यक्रमाला अक्षय सुक्रे,गट विकास अधिकारी पं.स.सिंदेवाही, डॉ.सुरपाम पशु वैद्यकीय अधिकारी, प्रामुख्याने उपस्थित होते.त्याचप्रमाणे विध्यार्थ्यांना वृक्षाबाबत मार्गदर्शन करतांना पी.एम गायकवाड वृक्ष लागवडीच मानवी व दैनंदिन जीवनातील महत्व ,या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच गट विकास अधिकारी अक्षय सुक्रे यांनी प्रत्येक विध्यार्थ्यानी एक झाड लावून जोपासना करावी असा सुरेख संदेश दिला,यानंतर वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक वनीकरण परीक्षेत्र चे वनपाल पी.एम .खोब्रागडे यांनी केले होते.यामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लाडबोरी चे शिक्षकवृंद गुरुनुले सर,रहागंडले सर, राजश्री वसाके मॅडम व ठाकरे मॅडम सुद्धा उपस्थित होत्या.त्याचप्रमाणे ग्रा.पं.लाडबोरी चे मंगेश दडमल उपसरपंच, कमलाकर कामडी,कमलाकर बोमनपल्लीवार,जिल्हा परिषद शाळा लाडबोरी येथील वर्ग 1 ते 7 चे एकूण 92 विध्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.विशेष म्हणजे पाऊस सुरु असताना देखील वर्ग 1 ली चे विध्यार्थी व शिक्षकांनी वृक्षरोपण केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत