(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी:- चंद्रपूर जिल्हा सहकार भारती ची कार्यकारणी सभा ब्रम्हपुरी येथील ब्रम्हपुरी अर्बन बँकेच्या सभागृहात संपन्न झाली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाअध्यक्ष विजय गोटे उपस्थित होते. या सभेमधे सहकार संदर्भातील येणाऱ्या विविध अडचणीवर विषयांनुसार चर्चा करण्यात आली तसेच सहकार भारती संस्थागत सभासद नोंदणी व निधी संकलन आढावा घेण्यात आला.तसेच तालुका कार्यकारणी पूर्णगठीत करणे याबाबत चर्चा करण्यात आली.येत्या सत्रात नागरी व कर्मचारी सहकारी पतसंस्थांच्या संचालक व कर्मचारी यांच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले व कोल्हापूर येथील प्रदेश बैठकीची माहीती यावेळी देण्यात आली.
या बैठकीला ब्रम्हपुरी अर्बन बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार प्रा.अतुल देशकर,माजी अध्यक्ष दत्ताजी कात्यायन,जिल्हा उपाध्यक्ष किशोर बुरांडे,जिल्हा महामंत्री जयंत श्रीवास्तव,संघटन प्रमुख प्रभाकर पाकमोडे,सह संघटक सतीश वासमवार,कोषाध्यक्ष महेश मासुरकर,कार्यकारणी सदस्य राजेशजी कावलकर,सूरज बोम्मावार,संजय मेश्राम,भैय्याजी जिभकाटे,विलास उरकुडे आदी जण उपस्थित होते.बैठकीचे संचालन सतीश वासमवार यांनी केले तर प्रभाकर पाकमोडे यांनी आभार मानले.