(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी परिसरात 2 अडीच वाजता पासून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. निंदा रोवना परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
येथून जवळच मौजा बेटाळा येथील गीता पुरुषोत्तम ढोंगे (४५) ही शेतमजूर महिला
शेतावर काम करून घरी परत येत असताना अंगावर वीज पडून मरण पावल्याची घटना आज ३ च्या दरम्यान घडली.
खूप गरिबीत जीवनयापन करणाऱ्या या महिलेच्या कुटुंबियांवर खूप मोठा आघात झाला असून मृतक महिलेच्या पश्चात पती,२ मुली आणि सासू असा परिवार आहे.