घरगुती वादामुळे तरुणाने विष घेउन आत्महत्या #Chandrapurचंद्रपूर:- घरगुती वाद विकोपाला गेल्याने एका तरुण इसमाने शेतीचे औषाध पिऊन आपली जीवन यात्र संपवली. देवाडा गावातली कोलाम गुडा येथील सूरज श्यामराव कोवे वय 25 या तरुणाचे काल दुपारी घरच्या मंडळी सोबत वादझाल्याची चर्चा आहे. हा वाद विकोपाला गेल्याने आपल्या राहत्या घरी शेतीत वापरण्यात येणाऱ्या औषधी प्राशन केले. त्यांनी औषध प्रशान केल्याच्या लक्षात येतात गावातली जागरूक नागरिक अब्दुल जाविद माजी उपसरपंच, सुकलदास सूर्तेकर, , कैलास चिटटलवार, विजय तपासे, अरबाज शेख, संजय निकोडे, सतीश नीकोडे, सुमित अंचालवार यानी देवाडा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले माञ तिथे डॉक्टर नसल्याने लगेच तरुणाला उप जिल्हा रुग्णालय राजुरा येथे हलविण्यात आले माञ परिस्थिती गंभीर असल्याचे त्वरित त्यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात यावे अशी सूचना राजुरा येथील डॉक्टर कडून देण्यात आले. पुरामुळे चंद्रपूर जाणाऱ्या दोन्ही मार्ग बंद असल्याने सर्व जागरूक नागरिक निराश न होता त्यांनी चारचाकी वाहने रेल्वे स्टेशन चुळणा येथे घेउन गेले. तिथून रेल्वे मार्ग जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आले.


आज सकाळी मुतकाची तब्येत बिघडली. दुपारी तीन वाजता सुमारास त्या तरुणाची प्राणज्योत मावळली. घरच्या तरुण युवकांचा मृत्यु झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.


देवाडा ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने परिसरातील रुग्णाला त्रास सहन करावा लागत आहे. सद्या पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याचे रुग्णाच्या संख्येत वाद झाली असून इथे कायम स्वरुपी डॉक्टर ची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी अब्दुल जाविद माजी उपसरपंच व नागरिकानी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत