शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या #chandrapur #chimur


चिमूर:- वाकर्ला येथील एका शेतकऱ्याने कर्जामुळे स्वतः च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी पहाटे घडलेली आहे. वाकर्ला येथील शेतकरी प्रभाकर मारुती माळवे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.


 प्रभाकर यांच्याकडे साडेसात एकर शेती असून ते दरवर्षी शेती करत असतात. त्यांच्या शेतात कापूस सोयाबीन आधी पीक होत असून यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे कापूस व सोयाबीन हे दोन्ही पीक हातातून निघून गेलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आंबोली येथील महाराष्ट्र बँक चे शेती कर्ज तसेच चिमूर येथील पतसंस्थेचे सोने गहाणाचे कर्ज व शेतीची मशागत करण्यासाठी घेतलेला ट्रॅक्टर ही कर्जाऊ घेतला असल्यामुळे हे लोन कसे फेडायचे अशी गंभीर परिस्थिती होती. ते मागिल काही दिवसापासून वैफल्यग्रस्त असल्याकारणाने त्यांनी आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे.


सध्या झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील जवळपास संपूर्ण सोयाबीन व कापूस पीक खरवडून गेलेले आहे. त्यामुळे यावर्षी शेत पीक होणार नाही व कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. सोमवारी पहाटे ते शेतावर गेले होते. ते परत आले नसल्यामुळे त्यांच्या मुलाने शेतात जाऊन बघितले असता वडील गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले. लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मुत्युदेह शवविच्छेदन साठी चिमूर येथील उपजिल्हारुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. मृतकाच्या मागे पत्नी एक मुलगा व एक मुलगी आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रामटेके शिपाई अमित उरकुडे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत