माणुसकीची हाक फाऊंडेशन तर्फे शालेय साहित्य व फळ वाटप कार्यक्रम #pombhurna #chandrapur

Bhairav Diwase
0
पोंभुर्णा:- तालुक्यात माणुसकीची हाक फाऊंडेशन च्या वतीने सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत शेंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातारा कोमटी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गंगापूर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आले.

सातारा कोमटी येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अण्णाजी नन्नावरे तर प्रमुख अतिथी फाऊंडेशन चे सचिव श्रीकांत शेंडे व प्रमुख पाहुणे उज्वल ठाकरे, भुपेश ठाकरे, भूषण इप्पलवार, बंडू ठाकरे प्रशांत नंदवर्धन, प्रतिमा चंदनखेडे, जयश्री कांमळे आणि गंगापूर येथील कार्यक्रमात अध्यक्षस्थानी वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. यशवंत कोसरे तर प्रमुख अतिथी फाऊंडेशन चे सचिव श्रीकांत शेंडे प्रमुख पाहुणे जुमनाके सर, मडावी, भूषण इप्पलवार, प्रणित गुरनुले तसेच इतर शिक्षक उपस्थित होते.

माणुसकीची हक फाऊंडेशन च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणीय कार्यात सदा तत्परतेने कार्य करीत आहे. आणि भविष्यात सामाजिक कार्य कार्याची इच्छा असणाऱ्या युवक व युवतींना एकत्र करून पुन्हा जोमाने काम करणार आहे. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक छोटेसा सामाजिक कार्य व्हावं या हेतूने आणि आपला वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांमध्ये साजरा होत असल्यामुळे माझ्यासाठी अति महत्वाचा दिवस राहील. तर असेच कार्यक्रम आपल्या माणुसकीची हाक फाऊंडेशन तर्फे सतत व्हावे आणि लोक हिताच्या कार्यासाठी आमच्या कडून शुभेच्छा असे अध्यक्ष स्थानावरून बोलले. आणि इतर मान्यवर आपआपले मत व्यक्त केले व शुभेच्छा दिले. त्या नंतर ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले या वेळी जनार्धन लेनगुरे, नितेश ढोले, राहुल साखलवार, रोहित आडे, लखन मडावी, चेतन गुरनुले, गणेश लेनगुरे, मयपाल ढोले व इतर सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)