......आणि अचानक नागरिकांच्या मोबाईलवर भारत सरकारच्या नावाने अलर्ट #chandrapur #EmargencyAlert

देशभरात अनेक मोबाईल वापरकर्त्यांना भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या वतीने एक अलर्ट आला. नागरिकांच्या फोनवर अचानक एक अलार्म वाजण्यास सुरुवात झाली. तसेच मोबाईलवर हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून आपतकालीन अलर्ट सेवेचे चाचणी घेण्याचा असल्याचं सांगण्यात आलं.

विशेष म्हणजे अशाप्रकारच्या आपतकालीन संदेश सेवेच्या चाचणीचा अलर्ट देण्यात येणार असल्याबाबत सरकारकडून कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे या अलर्टबाबत नागरिक अनेक शक्यता व्यक्त करत आहेत. या अलर्टनंतरही केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालय किंवा पीआयबीच्या ट्विटर हँडलवरही याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास अनेक मोबाईलधारकांचा मोबाईल अचानक मोठ्या आवाजात वाजायला लागला. यानंतर मोबाईलच्या स्क्रिनवर एक संदेश आला. त्यात हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या आपतकालीन संदेश सेवेचा भाग असल्याचं सांगण्यात आलं. काही सेकंद मोठ्या आवाजात अलार्म वाजल्यानंतर तोच मेसेज व्हॉईस मेल स्वरुपात ऐकू आला.

आपतकालीन संदेशातील ओके बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला असे आपतकालीन अलर्ट हवे आहेत का असं विचारण्यात आलं. तसेच हो आणि नाही असे दोन पर्याय देण्यात आले. आधी हा अलर्ट इंग्रजीत आला आणि त्यानंतर मराठीत आला.

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

अनामित म्हणाले…
Mujhe bhi aur mere sare dosto ko bhi aya akhir yeh hai kya
Emergency alert
Bhairav Diwase म्हणाले…
सविस्तर वृत्त दिले आहे
अनामित म्हणाले…
Ase ka br msg ale