गोंडवाना विद्यापीठाने निष्काळजीपणाने उत्तरपत्रिका तपासत परिक्षांचा लावला निकाल #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase
0

अभाविपचे विद्यापीठाला निवेदन

चंद्रपूर:- आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी सुपरिचित आहातच. अभाविप गेल्या ७४ वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अविरत कार्यरत आहे. अभाविप देशातीलच नव्हे जगातील सर्वात मोठे विद्यार्थी संघटन आहे हे आपण जाणताच.


अभाविपकडे या विद्यापीठाच्या अधिनस्थ असलेल्या शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर, गुरुनानक कॉलेज ऑफ सायन्स बल्लारपूर, शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूर, हायटेक कॉलेज ऑफ फार्मसी चंद्रपूर, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर व अन्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या परिक्षेच्या निकालासंदर्भात तकारी केल्या आहेत. अतिशय निष्काळजीपणाने उत्तरपत्रिका तपासत परिक्षांचा निकाल लावण्यात आला आहे असे विद्यार्थ्यांच्या तकारीवरुन लक्षात येते.


अनेक विद्यार्थ्यांनी पुरेसी उत्तरपत्रिका लिहलेली असताना सुध्दा निकालात नापास होणे हे आश्चर्यकारक असल्याचे म्हटले आहे. अशा स्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार आहे. तरी विद्यापीठ प्रशासनाने पुनर्मुल्यांकनारिता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या नापास झालेल्या सर्व विषयांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मुल्यांकन करावे आणि पुनर्मुल्यांकनात गुणवाढ झालेली असेल किंवा नसेल तरीही विनाशुल्क फोटोकॉपी उपलब्ध करुन द्यावे. जर पुनर्मुल्यांकनात गुण वाढले तर अशा विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे शुल्क त्वरीत परत करावे. या मागण्यांची गांभीर्याने दखल घेवून तातडीने योग्य निर्णय घ्यावे, अन्यथा छात्रशक्ती च्या रोषाला सामोरे जावे लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)