Top News

चंद्रपुरात अगरबत्तीच्या गोदामाला आग #chandrapur #Fire

चंद्रपूर:- शहरातील रामाळा गार्डन मार्गावरील जलाराम कंझुमर नामक अगरबत्तीच्या गोदामाला 29 जुलैला पहाटे 1 ते दीड वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत बरेच नुकसान झाले आहे.भानापेठ येथील रामाळा गार्डन रस्त्यावरील जलाराम कंझुमर नामक अगरबत्तीचे गोदाम आहे. रात्रीच्या वेळी नागरिकांना अचानक अगरबत्तीचा सुगंध येऊ लागल्याने नागरिकांनी बाहेर डोकावले असता त्यांना आगीचे चित्र दिसले.

अगरबत्ती गोदाम हे नागरी वस्तीत असल्याने नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात ते यशस्वी झाले नाही. याबाबत तात्काळ अग्निशमन विभागाला सूचना देण्यात आली. अग्निशमन विभागाच्या 3 वाहनांनी परिश्रम घेत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, गोदामात असलेली अगरबत्ती पूर्णतः जळून खाक झाली. या आगीत जलाराम कंझुमरचे चालक मेहुल सचदे यांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, याची माहिती अद्याप नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने