गोंडवाना विद्यापीठ च्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळावर आंतरराष्ट्रीय खेळाडू राजेश नायडू यांची निवड #chandrapur #gadchiroli #Gondwanauniversitygadchiroli

Bhairav Diwase
0
गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर्फे दिनांक 27 जून 2023 ला क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागा द्वारे एक पत्र काढून चंद्रपूरचे पहिले शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता खेळाडू राजेश नायडू यांची गोंडवाना विद्यापीठच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ५७ (२) अंतर्गत गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळावर सदस्य म्हणून ही नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती झाल्याबद्दल सर्वांकळून राजेश नायडू चे अभिनंदन करण्यात येत आहे.

गोंडवाना विद्यापीठ, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाअंतर्गत खेळाडूंच्या उत्तरोत्तर प्रगतिच्या दृष्टिने मला मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन करता येईल याचा मला आनंद आहे, तसेच मी या संधीचा लाभ घेऊन विद्यापीठ व संपूर्ण क्रीडाक्षेत्रातील खेळाडूंचा जास्तीत जास्त चांगल करण्याचा प्रयत्न करील असे राजेश नायडू यांनी या प्रसंगी बोलले आहे आणि आपल्या नियुक्तीसाठी त्यांनी माननीय कुलगुरू, मा. प्रभारी कुलगुरू, मा. कुलसचिव, संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि इतर हितचिंतकांचे आभार व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)