शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी काँग्रेसचा धडक मोर्चा #chandrapurचिमूर:- चिमूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शुक्रवारी दुपारी तहसील कृषी कार्यालय चिमूर येथे धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे हा मोर्चा चिमूर काँग्रेस पक्षाचे विधान सभा समन्वय डॉ. सतीश वारजूकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला आहे.

यात प्रामुख्याने मागील वर्षे नापी की होऊनी शेतकऱ्यांना शेती विम्याचा लाभ मिळालेला नाही शेतकऱ्यांच्या खर्चावर आधारित शेतमालाला भाव देण्यात आलेला नाही अवकाळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना अजून पर्यंत कोणतीही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही शेतकऱ्यांना अजूनही प्रोत्साहन पर रक्कम देण्यात आली नसून शेतकरी कर्जमुक्त झालेला नाही सरकार च्या वतीने चार पट उत्पादन वाढवण्यात येईल असे आश्वासन देण्यात आलेले आहे परंतु त्या आश्वासनाची पूर्तता आपल्या विभागाकडून होत नसल्याचे दिसून येत आहे मनरेगा मार्फत शेतीचे विकास कामे ठप्प आहेत जलसंधारण व शेततळे यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे त्याचप्रमाणेकृषी केंद्र धारकाकडून कृषी विभागामार्फत वसुली केल्या जाते, चिमूर येथे कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी आदी मागण्यांसाठी चिमूर तालुका कृषी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आले व निवेदन देण्यात आले.

यावेळी तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ.विजयजी गावंडे पाटील,शहराध्यक्ष अविनाश भाऊ अगडे,तालुका सचिव विजयजी डाबरे,युवक कांग्रेस अध्यक्ष चिमूर विधानसभा रोशनभाऊ ढोक,काँग्रेसचे तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नागेंद्र भाऊ चट्टे, ओबीसी विभाग तालुका अध्यक्ष विलास डांगे,ओमभाऊ खैरे,कमलसिंग अंधरीले,महिला तालुका अध्यक्ष वनिताताई मगरे, महिला शहराध्यक्ष राणीताई थुटे,माजी अध्यक्ष सविताताई चौधरी,माजी पंचायत समिती सदस्य भावनाताई बावनकर,मीडिया प्रमुख पप्पू शेख,घनश्याम रामटेके,दीपक जी कुंभारे, विलास पिसे,रुपचंद शास्त्रकार, अमोल जूनघरे, राकेश साटोणे,अक्षय लांजेवार, अमोल पोहनकर, देविदास मोहिनकर,कमलताई राऊत, गिता रानडे,दीक्षाताई भगत,अभिलाषा शिरभये,सहनाज अन्सारी,संपुर्ण पदाधिकारी,महिला मंडळ व युवक व कार्यकर्ते उपस्थित होते,*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत