Top News

भीम आर्मी संस्थापक यांच्या वर झालेल्या हल्ल्याचा निषेध


वरोरा:-
जय भीम युवा सेना सामाजिक संघटनांचे संस्थापक शुभम गवई यांच्या नेतृत्वामध्ये आज दिनांक 30/6/23 रोजी पोलीस स्टेशन वरोरा येथे निवेदन देण्यात आले.

२८ जून रोजी उत्तर प्रदेश येथील देवबांध क्षेत्रात भीम आर्मी प्रमुख तथा आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर अज्ञात आरोपीने गोळीबार केला त्यात ते जखमी झाले. बहुजन समाजातील लोकप्रिय जनप्रतिनिधी असलेले चंद्रशेखर आजाद यांच्यावर लाखो लोकांचा आस्था व विश्वास या घटनेमुळे लाखो लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. भीम आर्मी तर्फे चंद्रशेखर आझाद यांच्या सुरक्षेची मागणी नेहमीच करण्यात आली परंतु मनुवादी लोकांनी व योगी सरकारने त्यावर दुर्लक्ष केले. सुरक्षा प्रदान करण्यात आली नाही तरी सभा पत्रद्वारे आपणास पुन्हा सदर सुरक्षा विषयी पुन्हा समोर आणून झालेली घटना पुन्हा प्रवृत्ती होऊ नये याकरिता भीम आर्मीतर्फे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आंदोलन करण्यात येत आहे त्या घटनेच्या निषेधार्थ भीम आर्मी व समाज विचार आंबेडकर संघटना मार्फत मोर्चा काढण्यात आला. आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांना कठोर शिक्षा व्हावी तसेच चंद्रशेखर भाई यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी याकरिता जय भीम युवा सेना सामाजिक संघटनांचे संस्थापक तथा अध्यक्ष वरोरा येथे सकाळी 11 वाजता पोलिस स्टेशन वरोरा, येथे निवेदना देण्यात आले होते तरी सर्व विषयावर विशेष लक्ष देण्यात यावे ही विनंती सदर मागणी पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र बंद मोर्चा काढण्यात येणार याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

यावेळेस जय भीम युवा सेना चे कार्यकर्ते किसन वाघमारे, विकी पाटील, रितेश रायपुरे, वंदना नरवाडे, सचिन धनवे, विनय तेलमोरे, सुरज पेंदाम, सीमा नरवाडे, रमा राऊत, प्रफुल्ल लबाने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने