Top News

"या" पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी दिला तडकाफडकी राजीनामा! #Chandrapur #Jivati


जिवती:- आम आदमी पार्टीचे जिवती तालुका अध्यक्ष सुनिल भाऊ राठोड यांनी जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे यांच्यांकडे तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा सुपुर्द केला आहे अस अचानकपणे राजीनामा दिल्याने जिवती तालुक्यातील राजकारणात खळबळ माजली आहे.

कट्टर कार्यकर्ता म्हणुन ओळख असलेल्या सुनिल राठोड यांनी आम आदमी पार्टीची जिवती तालुका सारख्या ग्रामिण भागात ओळख निर्माण केली व तालुक्यात अनेक विकास कामे करुण आम आदमी पार्टी एक सक्षम व गोर गरीबांच्या हिताची पार्टी असल्याचे सिद्ध करुन दाखवले, मात्र अस अचानकपणे पार्टीला सोडण्या मागच कारण अजून पर्यंत कळायला नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून आम आदमी पार्टीची धुरा साभांळुन स्वबळावर आम आदमी पार्टीच्या वतीने 2022 च्या नोव्हेंबर ला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिवती तालुक्यातुन सरपंच उपसरपंच व सदस्य असे 35 उमेदवार निवडुन दिले होते असे दमदार युवा नेतृत्वाच्या राजीनामामुळे आम आदमी पार्टीत खिंडार पडली आहे, मात्र सुनिल राठोड कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे अजुन पर्यंत कळायला नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने