वंदना विनोद बरडे जिल्हा चंद्रपूर सिटी एक्सलन्स अवार्डने सन्मानित #chandrapur


चंद्रपूर:- सौ. वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर ह्या गेले २ वर्षा पासुन उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे कार्यरत आहे.त्यांना आपल्या कारकीर्दिला २८ वर्ष झाले.त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यासाठी त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक उपक्रम राबविले.स्वत: हिरारीने भाग घेवून प्रचार व प्रसार करण्याचे काम केले.अनेक राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन केले.अनेक स्पर्धा घेतल्या.रुग्णांच्या व कर्मचारी यांच्या स्पर्धा घेवून प्रचार व प्रसार आणि जनजागृतीचे कार्य केले.अनेक आरोग्य योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली.अनेक आरोग्य दिवस, धूर्धर आजार सिकलसेल,काॅन्सर, अनेमिया , लसीकरण ,गरोदर माताची काळ्जी, लहान बालकांची काळजी, म्हातार्या लोकांची काळजी, मुके बहीरे दिव्यांग लोकांचि काळजी इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले.अवयव दान, देहदान, रक्त दान, नेत्र दान इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे काम केले व आवाहन पण केलें. अनेक उपक्रम राबविले,शिक्षित केले.अनेक कार्यक्रमात गेस्ट स्पिकर म्हणून भाषणं केलीत .

मार्गदर्शन केले. मधुमेह, लठ्ठपणा,विजेची बचत, पाण्याची बचत, स्वच्छता अभियान, आहार विहार इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले बेटी बचाव बेटी पढाओ, पर्यावरण, आणि आरोग्य सेवा विषयी माहिती देण्यात आली.महात्मा ज्योतिबा फुले योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री योजना, इत्यादी योजना प्रचार व प्रसार केला.आनंदी आणि तणाव मुक्त कसे राहायचे योगासने,प्राणायाम ,मेडिटेशन करण्याचें काम केले.अनेक दिवस व सप्ताह चे कार्यक्रम आयोजित केले होते जसे की पौषन आहार सप्ताह, स्तनपान सप्ताह, अंधश्रद्धा निर्मूलन, अंधत्व निवारण कार्यक्रम, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम,बिपि नियंत्रण कार्यक्रम, आयोजित केले.सुध्रूढ बालक जागरुक पालक ,माता सुरक्षीत घर सूरक्षित,, कमी वजनाच्या बालकांचे आरोग्य, कार्यक्रम आयोजित करण्यात आले व व्यवस्थापण करून मार्गदर्शन केले.त्यांच्या या कार्यासाठी फ्लाॅरेन्स नाईटिंगेल अवार्ड जागतिक परिचारिका सप्ताहाच्या निमित्ताने प्रथम पूरस्कार चंद्रपूर जिल्हातुन मिळाला.

आर्यन लेडी अवार्ड, सिटी एक्सलन्स अवार्डने सन्मानित करण्यात आले. याअगोदर त्यांना टाईम्स ऑफ इंडिया यांच्या कळून अचीव्हमेन्ट अवार्ड अनेक अवार्ड, प्रमाणपत्र,शिल्ड,मोमेंन्टो, मिळालेले आहे.त्या सामाजिक कार्य पण करतात.अनेक संस्था मध्ये पदाधिकारी म्हणून काम करतात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळ अध्यक्ष सौभाग्य नगर नागपूर, धनगर अधिकारी कर्मचारी महिला मंडळ कार्याध्यक्ष, नर्सिंग असोशियन सदस्य, धनगर समाज महीला बचत गट सदस्य.माऊली म़ंडळ सदस्य.अनेक संस्थांचे सदस्य. आपला सुट्टीचा दिवस सामाजिक कार्यात घालवतात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या