शिष्यवृत्ती रक्कम वितरण प्रलंबित असल्याबाबतचे विद्यापीठांना पत्र #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- सर्वसामान्य व गरीब विद्यार्थ्यांना मोफत तसेच सवलतीच्या दरात शिक्षण घेता यावे, म्हणून केंद्र व राज्य सरकार निव्वळ शिक्षण शुल्काची शिष्यवृत्तीच्या रूपाने परतफेड करण्यासाठी कोट्यवधी रुपये देत असले, तरी प्रत्यक्षात याचा लाभ गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी १-२ वर्षे लागतात. शैक्षणिक वर्ष संपले तरी विद्यार्थ्यांना ‘शिष्यवृत्तीची रक्कम मिळेना’ शिष्यवृत्तीची रक्कम केव्हा मिळेल? याची विचारणा करण्यासाठी महाविद्यालयात खेटे मारावे लागत आहे. प्रथम वर्षाच्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर शिष्यवृत्ती मिळण्यासाठी शेवटचे वर्ष उजाडावे लागले. तरी पण एक-दोन वर्षापासून शिष्यवृत्ती मिळालीच नाही.


शिष्यवृत्ती मिळत नसल्यामुळे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नवीन सत्रात प्रवेश घेण्यासाठी शाळा सोडण्याचा दाखला मिळत नसल्याने विद्यार्थी संताप व्यक्त करीत असल्याची बातमी आधार न्युज नेटवर्क ला ३ जुलैला प्रकाशित करण्यात आली. सहसंचालक उच्च शिक्षण, नागपूर विभाग नागपूर यांनी शिष्यवृत्ती रक्कम वितरण प्रलंबित असल्याबाबतचे पत्र गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांना देण्यात आले आहे.


काय म्हटले आहेत पत्रात?

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, काही विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे वितरण ज्या कारणामुळे प्रलंबित आहे अशा विद्याथ्र्यांची व कारणांची माहिती महाडीबीटी पोर्टल प्राचार्य लॉगीन मध्ये " Report- Student-Institute Detail Reason Report" उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा या बाबतची माहिती SMS द्वारे देण्यात आलेली आहे.

शिष्यवृत्ती वितरण प्रलंबित असलेल्या विद्यार्थी व कारणाची माहिती महाडीबीटी पोर्टलवरून प्राप्त करून विद्यार्थ्यांना आवश्यक कायवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे. विद्यार्थी शिष्यवृत्ती वितरण त्वरीत होणे आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांकडून ज्या कारणामुळे वितरण प्रलंबित आहे. त्या त्रुटींची पुर्तता करून घ्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)