नाकाबंदीदरम्यान दुचाकीसह बंदुका सोडून दोघे पसार #chandrapur #gadchiroli #Etapalli


एटापल्ली:- एटापल्ली- कसनसूर मार्गावर नाकाबंदीदरम्यान पोलिसांना पाहून दोन संशयितांनी काही अंतरावर दुचाकी उभी करून पळ काढला. पळताना जवळची चटई पाण्यात फेकली. पोलिसांनी चटई उचलली असता त्याखाली दोन बंदुका आढळल्या. त्यामुळे पोलिसही हादरुन गेले.


एटापल्लीचे उपअधीक्षक डॉ.सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी रविराज कांबळे हे उपनिरीक्षक संतोष मोरे, सविता काळे व सहकाऱ्यांसमवेत १३ जुलै रोजी सकाळी कसनसूर मार्गावर नाकाबंदी करुन वाहनांची झडती घेत हाेते. यावेळी दुचाकीवरुन (एमएच ३३ डी- ५७४९) दोघे आले. पोलिसांना पाहून ते थबकले.

दोघांनी दुचाकी तेथेच उभी केली. त्यांच्याजवळ असलेली चटई त्यांनी एका नाल्यात टाकली व तेथून धावत सुटले. पोलिसांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते जंगलातून पसार झाले. दरम्यान गुन्हा नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या