Top News

लोकसंख्या नियंत्रणासाठी समाजात विविध जनजागृती उपक्रम राबवावे लागतील:- प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर #chandrapur


चंद्रपूर:- लोकसंख्येचा भस्मासुर संपूर्ण जगाला गिळंकृत करायला सज्ज झालेला आहे. विज्ञानाची कास धरून विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या मानवाच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडसर वाढती लोकसंख्या असल्यामुळे लोकसंख्या नियंत्रण ही काळाची सर्वात मोठी गरज आहे त्यासाठी समाजात विविध जनजागृती उपक्रम राबवावे लागतील असे प्रतिपादन "11 जुलै २०२३ जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त" लोकसंख्या अभ्यास मंडळाच्या वतीने " लोकसंख्या वाढ आणि त्याचे भारतावरील परिणाम " या विषयावर आयोजित आभासी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित, सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. निखील देशमुख यांनी जागतिक लोकसंख्या दिन कधीपासून व का साजरा केला जातो, तसेच कार्यक्षम लोकसंख्या आणि अकार्यक्षम लोकसंख्या म्हणजे काय यावर आपल्या प्रास्ताविकातून प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.आर.के.डांगे, अध्यक्ष, भूगोल अभ्यास मंडळ गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी "लोकसंख्या वाढ आणि त्याचे भारतावरील परिणाम " या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

शासन स्तरावरील उपाय योजनेवर अवलंबून न राहता प्रत्येक भारतीय नागरिकांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून देशाच्या भवितव्यासाठी स्त्री -पुरुष असा कोणताही भेदभाव न करता कुटुंब नियोजनावर भर द्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.पुरुषोत्तम माहुरे समन्वयक, लोकसंख्या शिक्षण मंडळ यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.अमोल कुटेमाटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रमोद शंभरकर, प्रा. सोहन कोल्हे, प्रा. संतोष शिंदे व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
उपरोक्त उपक्रमाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा, आदरणीय श्रीमती सुधाताई पोटदुखे , कार्याध्यक्ष, श्री.अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्री.सुदर्शनजी निमकर सचिव श्री.प्रशांत भाऊ पोटदुखे, सहसचिव माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दिक्षित, कोषाध्यक्ष श्री. मनोहर तारकुंडे, सदस्य, सौ. सगुनाताई तलांडी, श्री.राकेश पटेल, श्री.एस.के, रमजान यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने