नव्या क्षमतांसह चांद्रयान-3 उद्या उड्डाणासाठी सज्ज 4#chandrapur


चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान निदर्शनास आलेल्या त्रुटी, दोष सुधारून नवे चांद्रयान- 3 उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. चंद्रावर उतरणाऱ्या ‘विक्रम’ लँडर रोव्हर यानाला यावेळी अधिक मजबूत चाके बसवण्यात आली असून उतरण्याची जागाही विस्तीर्ण अशी निवडण्यात आली आहे. हे लँडर चाचण्यांदरम्यान विविध उंचीवरून आदळून त्याची धक्का सहन करण्याची क्षमताही ‘इस्रो’ने आजमावून पाहिली आहे.

आणीबाणीच्या वेळी उतरण्याची जागा ऐनवेळी बदलता येईल अशी यंत्रणाही शुक्रवारी झेपावणाऱ्या चांद्रयान 3 मध्ये आहे. चंद्रावर उतरणाऱ्या लँडरच्या चहुबाजूंनी या वेळी सौर ऊर्जा पॅनेल लावण्यात आली आहेत. गेली चार वर्षे लागोपाठ चाचण्या घेऊन ‘इस्रो’ने प्रत्येक संभाव्य त्रुटींवर मात करता येईल अशा सुधारणा नव्या यानात केल्या आहेत.

शुक्रवारी दुपारी 2.35 वाजता अवकाशात झेपावलेल्या या यानातील लँडर-रोव्हर भाग चंद्राच्या पृष्ठभागावर 24-25 ऑगस्टला उतरेल. चंद्रावरील संशोधनाचे संदेश रोव्हर लँडरकडे, लँडरकडून कक्षेतील यानाकडे आणि या यानाकडून ‘इस्रो’च्या नियंत्रण कक्षाकडे येणार आहेत. या चंद्रावतरणाची जबाबदारी मोहीम संचालिका म्हणून रितू कारिधाल यांच्यावर आहे. प्रकल्प संचालक पी. वीरामुथुवेल आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत