शिक्षणतज्ञाने केला विनयभंग; पोलिसात गुन्हा दाखल #chandrapur #sindewahi


सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील एका अल्पवयीन मुलगी सिंदेवाही येथे शिक्षणाकरिता किरायाच्या घरात लहान भावासोबत राहते. अल्पवयीन मुलगी तिन वर्षापासून तालुका स्तरीय निबंध स्पर्धा व प्रश्न मंजूषा परीक्षा देत होती. सदर परीक्षा सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या शिक्षण विभात शिक्षणतज्ञ म्हणून कार्यरत असलेले प्रा. भारत मेश्राम हे घेत होते. ह्या परीक्षे अल्पवयीन मुलगी ही उत्कृष्ठ अंकांनी पास झाल्यामुळे तिचा सत्कारही भारत मेश्राम यांनी केला होता. त्यातुन हीची ओळख भारत मेश्राम सोबत होऊन पारीवारीक संबध तयार झाले. पन त्या संबंधाला काळीमा फासनारी व लाज आननारे कृत्य भारत मेश्राम यांनी केेले.

धक्कादायक घटना दिनांक 12 जुलैला समोर आली असून, विद्यार्थीनी सोबत अश्लील चाळे केले आहेत. अल्पवयीन मुलगी व तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून शिक्षकतज्ञावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

दि 12/07/2023ला अल्पवयीन मुलीचा भाऊ सकाळी 11 वाजता शाळेत गेल्यामुळे एकटीच घरी होती. दरम्यान अंदाजे 4 वाजताच्या सुमारास भारत मेश्राम या शिक्षकतज्ञाने फोन करून एका गावच्या जिल्हा परिषद शाळेला शिक्षक पाहिजे त्याची चर्चा करायची असल्याने मि रुम वर येत असल्याचे कळविले व 04:30 वाजताच्या दरम्यान रुम वर गेले व आज तुझा वाढदिवस असल्याने मि तुला कपडे घेऊन देतो असे म्हणत अश्लील चाळे करून विनयभंग केल्यामुळे सदर घटनेची तक्रार आईवडील यांचे सह सिंदेवाही पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली असून सिंदेवाही पोलीसांनी गुन्ह्यांची नोंद करून आरोपी शिक्षणतज्ञास ताब्यात घेतले. आहे. पुढील चौकशी ठाणेदार तुषार चव्हाण यांचे मार्गदर्शनात पि.एस.आय सागर महल्ले करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या