चंद्रपूर जिल्ह्यात ३ शाळकरी मुले नदीच्या प्रवाहात वाहून गेले #chandrapur #gondpipari

Bhairav Diwase
0

गोंडपिपरी:- तालुक्यातील तोहगाव येथील वर्धा नदी पात्रात पोहायला गेलेले ३ शाळकरी मुलं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची खळबळजनक घटना आज दि. ८ जुलैला शनिवारी दुपारी दोन वाजता दरम्यान घडली.तोहगाव वरून दोन किलोमीटर शिंदी जवळ असणाऱ्या वर्धा नदीत १० ते ११ वयोगटातील ४ मित्र पोहायला गेले. त्यापैकी ३ जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. नदी पात्रावर त्यांचे कपडे व पादत्राणे असल्याने हा अंदाज बांधल्या जात आहे.


वाहून गेल्यामध्ये प्रतिक नेताजी जुनघरे, निर्दोष ईश्वर रंगारी, सोनल सुरेश रायपुरे ही मुले असल्याची चर्चा असून आरुष प्रकाश चांदेकर हा मुलगा मात्र पाण्यात न उतरल्याने घरी वापस आल्याचे बोलल्या जात आहे.

गावातीलच एका महिलेने ३ मुलांना पाण्यात वाहून जाताना बघितल्याने युद्धस्तरावर शोध मोहीम सुरू असून घटनास्थळी लाठी व कोठारी पोलीस दाखल झाले आहे. अद्याप मुलांचा शोध लागला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)