"त्या" शंभर युवकांचे ड्रायव्हिंग प्रशिक्षण पुर्ण #chandrapur #pombhurna


डाॅ.श्यामाप्रसाद जन वन योजनेअंतर्गत उपक्रम
पोंभूर्णा:- मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर,वनपरिक्षेत्र पोंभुर्णा अंतर्गत एक्सलेंट ड्रायव्हिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट छिंदवाडा यांच्या पुढाकाराने वनालगत असलेल्या चार गावातील १०० युवकांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेअंतर्गत एक महिना कालावधी ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार निर्मितीचे संधी उपलब्ध करून देण्यात आले आहे.आता या वनावगतच्या १०० युवकांच्या हातात ड्रायव्हिंगचे कौशल्य अवगत झाल्याने रोजगाराचे विविध वाटा मिळाले आहे.एक महिण्याचे प्रशिक्षण देवून प्रशिक्षण पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र यावेळी मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मध्य चांदा वनविभाग उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, प्रमुख अतिथी वनपरिक्षेत्र अधिकारी फणिंद्र गादेवार,परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल धाईत,एक्सलेंस ड्रॉयव्हींगचे संचालक मुर्लीधर गोदेवार,संयुक्त वनव्यवस्थापन समिती गंगापूरचे अध्यक्ष यशवंत कोसरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना अंतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सहभागाने वन विभागामार्फत घनोटी तुकुम,सीताबाई तुकुम,
गंगापूर,खरमत या गावातील वय १८ ते ४० वर्ष वयोगटातील १०० युवकांना ड्रायव्हिंग प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात ५ जुन पासून करण्यात आली होती. एक महिण्याचे ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण पुर्ण झाल्याने ७ जुलैला त्यांना प्रशिक्षण पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन वनरक्षक सोनी मारमोलीवार यांनी तर आभार प्रदर्शन वनरक्षक अजय ढवळे, कार्यक्रमाकरीता उपस्थित वनरक्षक प्रशांत शेंडे, वनरक्षक विनायक कस्तुरे व वनकर्मचारी तसेच प्रशिक्षक नरेंद्र सूर्यवंशी, एक्सलेंस ड्रॉयव्हींग प्रशिक्षण संस्थेची चमू व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत