चंद्रपूर जिल्ह्यात पोहायला गेलेली तीन मुलं बेपत्ता #chandrapur #gondpipari

गोंडपिपरी:- तोहोगाव गावाजवळून गेलेल्या वर्धा नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या चार मुलांपैकी तिघे जण बेपत्ता झाले असून एक जन घरी परत आला आहे. ही दुर्घटना आज शनिवारी गोंडपिपरी तालुक्यांतील तोहोगाव जवळील नदी पात्रात घडली.

बेपत्ता मुले तोहोगाव येथील असुन पोलीसांनी त्यांची सायंकाळ पर्यन्त शोधमोहीम राबविली परंतू शोध लागला नव्हता.गोंडपिपरी तालुक्यारील तोहोगाव जवळून वर्धा नदी वाहत गेली आहे. तोहोगाव येथील प्रतिक नेताजी जुनघरे, निर्दोष ईश्वर रंगारी, सोनल सुरेश रायपुरे व अन्य एक जण असे चौघे वर्धा नदीच्या पात्रात आज शनिवारी पोहायला गेलेत.


चौघेही पोहण्याचा प्रयत्न करत असताना त्यापैकी तिघे जण वाहून गेल्याने बेपत्ता झाले तर एक जण घरी परतला. घरी आलेल्या मुलाने सर्व हकिकत सांगितली. लगेच गावकऱ्यानी नदी पात्राकडे धाव घेतली. नदीत मुलांचा शोध घेतला परंतु मिळाले नाही. नदी किनाऱ्यावर मुलांचे कपडे दिसून आलेत. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सायंकाळ पर्यंत त्यांचा शोध घेतला ते मिळाले नाहीत. तोहोगाव निवासी प्रतिक नेताजीजुनघरे, निर्दोष ईश्वर रंगारी, सोनल सुरेश रायपुरे वाहून गेल्याने गावात शोककळा पसरली आहे. सर्व मुले दहा वर्ष वयोगटातील आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत