अन् बुडालेल्या तीन मुलांपैकी एकाचा मृतदेह लागला हाती #chandrapur #gondpipari

Bhairav Diwase
0

गोंडपिपरी:- तोहोगाव गावाजवळून गेलेल्या वर्धा नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या चार मुलांपैकी तिघे जण बेपत्ता झाले असून एक जन घरी परत आला आहे. ही दुर्घटना शनिवारी गोंडपिपरी तालुक्यांतील तोहोगाव जवळील नदी पात्रात घडली. (And the body of one of the three drowned children was found)


पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दिवसभर शोध मोहीम राबविली परंतु रात्रौ झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली, या दरम्यान दोन पोलिसच वाहून जात होते परंतु स्थानिकांच्या मदतीने बचावले अशी माहिती स्थानिकांनी दिली.

वर्धा नदीपात्रात पोहायला गेलेल्या तीन चिमुकल्यांपैकी एकाचा मृतदेह सकाळी गावातीलच मासेमारांना आढळल्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे‌ प्रतीक नेताजी जुनघरे असे मृतदेह बाहेर काढलेल्या चिमुकल्याने नाव आहे.

अजूनही निर्दोष ईश्वर रंगारी व सोनल सुरेश रायपुरे हे दोघेही मुलं बेपत्ता आहेत. थोड्या वेळाने पुन्हा प्रशासनाच्या वतीने शोध मोहीम राबविली जाणार असून तेव्हा तरी दोघे चिमुकले आढळतील अशी आशा तोहोगाव वासी करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)