पोहण्याचा मोह! "त्या" ३ शाळकरी मुलांचे आढळले मृतदेह #chandrapur #gondpipari #death

Bhairav Diwase
0
गोंडपिपरी:- तोहोगाव गावाजवळून गेलेल्या वर्धा नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या चार मुलांपैकी तिघे जण बेपत्ता झाले असून एक जण घरी परत आला आहे. ही घटना शनिवारी गोंडपिपरी तालुक्यांतील तोहोगाव जवळील नदी पात्रात घडली.घटनास्थळी पोलिस दाखल

काल पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन सायंकाळी शोध मोहीम राबविली. परंतु रात्रौ झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. पुन्हा आज सकाळ पासून पोलीसांनी शोध मोहीम राबविली. एकाचा मृतदेह सकाळी गावातीलच मासेमारांना आढळल्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. तर दोन मृतदेह आर्वी पुलाजवळ आढळल्याची माहिती आहे.

पोहण्याचा मोह जीवावर बेतला!

गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव गावाजवळून गेलेल्या वर्धा नदीच्या पात्रात पोहायला गेले. चार मुलांपैकी तिघे जणांचा मृत्यू झाला असून एक जण घरी परत आला आहे. पोहण्याचा मोह तीन मुलांच्या जीवावर बेतला. हि घटना शनिवारी गोंडपिपरी तालुक्यांतील तोहोगाव जवळील नदी पात्रात घडली.
"त्या" ३ शाळकरी मुलांचे आढळले मृतदेह

वर्धा नदीपात्रात पोहायला गेलेल्या तीन चिमुकल्यांपैकी एकाचा मृतदेह सकाळी गावातीलच मासेमारांना आढळल्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. प्रतीक नेताजी जुनघरे असे मृतदेह सकाळच्या वेळी बाहेर काढलेल्या चिमुकल्याने नाव आहे. तर निर्दोष ईश्वर रंगारी व सोनल सुरेश रायपुरे या दोन मुलांचा मृतदेह आर्वी पुलाजवळ आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. तिन्हीं मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)