चंद्रपूर:- अल्पवयीन मुलींची व महिलांची छेड काढणाऱ्या विकृतला मनसे चोप दिला. तेव्हाच समाजात वावरणाऱ्या अश्या विकृतना आळा बसेल. महिला सुरक्षा हा कळीचा मुद्दा असूनदेखील काही लोकप्रतिनिधी याविरोधात मुंग गिळुन गप्प असतात. नुकतेच कोरपना शहारात झालेल्या अल्पवयीन मुलींचे लैगिंक शोषण याविरोधात राजुरा विधानसभेतील आमदार व शेतकरी नेते चिडीचूप होते आपण सर्वांनी पाहिले. काही लोकांनी अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा राजकारणासाठी वापर केला ही देखील एक विकृती आहे. परंतू आम्ही राजसाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिक आहोत अश्या विकृताना आम्ही वेळीच ठेचातो इतरांची वाट पाहत नाही. असे मनसे नेते सचिन भोयर यांनी म्हटले.
घटनाक्रम याप्रमाणे आहे. सचिन भोयर यांना चिकनगुनिया झाला असल्यामुळे डॉक्टर ढवस यांच्याकडे उपचारार्थ दाखल होतो. घटनेच्या आदल्या दिवशी चिकनगुनियाच्या प्रचंड दुखण्यापाई उठता-बसता-चालता येत नव्हते. असे असताना चंद्रपूर बसस्टँड परिसरात एक विकृत इसम अल्पवयीन मुलींची छेड काढत आहे. महिलांशी लगट साधण्याचा प्रयत्न करीत आहे. जागा असताना देखील मुलींना रेटून चालत आहे. अशी तक्रार सचिन भोयर यांना दवाखान्यात ऍडमिट असताना फोन द्वारे प्राप्त झाली. स्टॅरॉइड इंजेक्शन, तीन ग्लुकोज सलाईन लागून चौथी सलाईन सुरु होती आणि नेमकाच तेव्हा कॉल आला बस स्थानकावर पोलीस सुरक्षा, सीसीटीव्ही, वर्दळ असून देखील असा प्रकार सुरू आहे असे समोरून सांगण्यात आले. आणि प्रचंड चिड मनात निर्माण झाली.
सचिन भोयर यांनी डॉक्टरांना माझी सलाईन पंधरा मिनिटांसाठी काढा अशी विनंती केली आणि लगेच चंद्रपूर बस स्थानक परिसरात पोहोचून त्या विकृताला महिलांशी लगट करताना पकडून चांगला चोप दिला त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. परंतु अश्या घटना घडत असताना काही समाज बांधव मुक दर्शक बनून दुर्लक्ष करतात ही गोष्ट मनाला वेदना देते. दुसऱ्यांची आई-बहीण आपली आई-बहिण ,दुसऱ्यांच्या आई बहिणींची सुरक्षा ही आपल्या आई-बहिणींची सुरक्षा ही भावना जोपर्यंत सर्वांच्या मनात रुढणार नाही तोपर्यंत अशा घटना घडतच राहतील.बांधवांनो जागृत व्हा अश्या घटनांवर लक्ष ठेवा व अश्या विकृतांना वेळीच ठेचून काढा.