बल्लारपूरमधून मुनगंटीवार, चिमूरमधून भांगडिया निवडणूक लढणार
चंद्रपूर:- महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं खरं बिगूल आज वाजताना दिसत आहे. कारण भाजपकडून आज अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे.
भाजपकडून पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत बल्लारपूरमधून पुन्हा एकदा सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. चिमूरमधून किर्तीकुमार भांगडिया यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.