Chandrapur School Bus Accident : विद्यार्थांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे लालबहादूर शास्त्री विद्यालयाची बस हरदोना गावानजीक उलटली. यात सुमारे वीस विद्यार्थी जखमी झाले आहेत. या बसमध्ये 60 विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांना घेऊन ही बस शाळेकडे निघाली होती. मात्र वाटेत चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला उलटली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. जखमी विद्यार्थ्यांना गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, लालबहादूर शास्त्री विद्यालयाची बस नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल शाळेकडे निघाली होती. बसमध्ये तब्बल ६० विद्यार्थी होते. दरम्यान स्कूल बस हरदोना गावानजीक आली असता चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. चालकाला बस थांबवता आली नाही आणि काही क्षणात बस रस्त्याच्या बाजूला जावून उलटली.

या अपघात २० विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढलं. जखमी विद्यार्थ्यांना गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं. माहिती मिळताच पालकांनीही रुग्णालयात धाव घेतली आहे. विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरू असून पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)