गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांच्या सर्व मा. प्राचार्य/प्राचार्या, सर्व विद्यार्थ्यांना, पदव्युत्तर शैक्षणिक विभागाचे विभाग प्रमुख तसेच संबंधितांना सुचित करण्यान देने की, विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र 2024-25 मधील हिवाळी 2024 च्या सर्व अभ्यासक्रमांच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा दि. 23 ऑक्टोंबर 2024 पासून आयोजित करण्यात आलेल्या होत्या व हिवाळी 2024 च्या परीक्षेचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले होते.
अनेक विद्यार्थी व प्राध्यापक संघटनांची मागणी विचारात घेऊन पदवीच्या प्रथम, तृतीय, पाचवे सातवे व नवदे (Sem-I, III, V, VII, IX) नियमीत (Regular) सत्राच्या दि. 23 ऑक्टोंबर 2024 पासून घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून या सत्रातील सर्व अभ्यासक्रमांचे वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल मात्र व्दितीय, चतुर्थ, सहावे, आठवे आणि दहावे सत्र (Sem- II IV VI VIII X) मागील सत्रातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या (Repeater) परीक्षा नियोजित तारखेपासून घेण्यात येईल.
तसेच पदव्युत्तरच्या प्रथम व तृतीय सत्राच्या परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात येत असुन नविन वेळापत्रक लवकरच जाहिर करण्यात येईल. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.