Chandrapur ACB Trap: 2 विस्तार अधिकारी सह सेवानिवृत्त कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Bhairav Diwase
चंद्रपूर:- शिक्षण विभाग (माध्यमीक), जिल्हा परिषद चंद्रपूर येथील (१) श्री. सावन चालखुरे, विस्तार अधिकारी (शिक्षण) २) श्री. लघुत्तम किसन राठोड, वय ५६ वर्षे, विस्तार अधिकारी (शिक्षण), जिल्हा परिषद, चंद्रपूर (३) श्री. महेश्वर कारूजी फुलझेले, वय ७३ वर्षे, सेवानिवृत्त जेष्ठ सहायक, जिल्हा परिषद (प्राथ.), चंद्रपूर यांचेविरूध्द ५०,०००/- रूपये लाच मागणी संबंधाने अॅन्टी करप्शन ब्युरो चंद्रपूर यांचे पथकाने आज रोजी कार्यवाही केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांचे कम्पुटर इंस्टीट्यूट असून कम्पुटर इंस्टीटयूट मध्ये नविन मराठी, इंग्रजी आणि हिंदी GCC and TBC Computer Typing हा कोर्स सुरू करायचा असल्याने शासनाकडून मान्यता मिळण्याकरीता महत्त्वाचे कागदपत्रासह जिल्हा परिषद, चंद्रपूर येथील शिक्षण विभाग येथे अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदार हे शिक्षण विभाग (माध्यमीक), जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे आलोसे क्र. १ सावन चालखुरे, विस्तार अधिकारी व आलोसे क. २ लघुत्तम राठोड, विस्तार अधिकारी यांना भेटले असता त्यांनी प्रस्ताव शासनास सादर करण्याचे कामाकरीता शिक्षणाधिकारी मॅडम पैसे मागत असुन तुम्ही ते दिल्याशिवाय तुमचे काम होणार नाही असे सांगुन तक्रादारास ७०,०००/- रूपये लाच रकमेची मागणी केली होती. परंतु तक्रारदार यांना आलोसे क्र. १ सावन चालखुरे, विस्तार अधिकारी व आलोसे क. २ लघुत्तम राठोड, विस्तार अधिकारी यांना लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे येवुन दिनांक ३१/०७/२०२४ रोजी तक्रार नोंदविली. प्राप्त तक्रारीवरून वेळोवेळी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान आलोसे क. १ आणि २यांनी तक्रारदार यांना त्यांचा प्रस्ताव शासनास मंजुरीकरीता पाठविण्याकरीता ७०,०००/ रू. लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती ५०,०००/- रू. लाच स्विकारण्याचे मान्य केले व आलोसे क. ३ महेश्वर फुलझेले यांनी लाच रक्कम देण्यास अपप्रेरणा दिली. त्यावरून आज दि. २७/०९/२०२४ रोजी वरिल तिन्ही आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरू आहे.

सदरची कार्यवाही श्री. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, सफौ रमेश दुपारे, पोहवा अरूण हटवार, पोहवा नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, हिवराज नेवारे, पोशि वैभव गाडगे, अमोल सिडाम, प्रदिप ताडाम, राकेश जांभुळकर, म.पो.शि. मेघा मोहुर्ले, पुष्पा काचोळे, चापोशि सतिश सिडाम सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर तसेच चापोशि रवि तायडे, मो.प.वि. चंद्रपूर यांनी यशस्वी पार पाडली आहे. हॅश व्हॅल्यु घेण्यात आलेली आहे.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा