आदिवासी मतिमंद मुलीचे हातपाय बांधून बलात्कार #chandrapur #Jivati

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील उप पोलिस स्टेशन पिट्टीगुडाच्या हद्दीतील आंबेझरी येथे कोलाम जमातीच्या १९ वर्षीय मतिमंद मुलींचे हातपाय बांधून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी आरोपी शरफोदीन शबीर शेख (४४) याला तात्काळ अटक केली असून बलात्कारासह अनुसूचित जाती, जमाती अत्याचार संरक्षण अधिनियम १९८९ सुधारणा २०१५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत मुलगी मतिमंद आहे. ती घरात एकटीच असल्याची संधी साधून आरोपी शरफोदीन शबीर शेख याने पिडीतेचे घर गाठले. पिडीत मतिमंद असल्याचा फायदा घेऊन आरोपींने पिडीत मुलीचे दोन्ही हातपाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.

पिडीतेच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती होताच त्यांनी लगेच पिटीगुड्डा पोलिस स्टेशन गाठत घटनेची तक्रार दाखल केली. पिट्टीगुडा पोलिसांनी रात्री उशिरा आरोपी विरुद्ध कलम गुन्हा दाखल करून आरोपी ला अटक केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या