चिमूर नगर परिषद अंतर्गत समस्या चे उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन*

 
चिमूर शहर काँग्रेस ने उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्या मार्फत दिले निवेदन.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) शार्दुल पचारे, चिमूर 
चिमूर:- चिमूर सारखा ऐतेहासिक नगरीत नगर परिषद अंतर्गत अनेक समस्या संदर्भात गलथानपणा व दुर्लक्षिनतेमुळे  जनतेला दैनंदिन जिवन  प्रणालीत अनेक अडचणींचा समोर जावे लागते सामाजिक आरोग्य व सामाजिक गरजा यांचा वेळ नगर परिषदेने निरुत्साही व भ्रष्टाचार वृत्तीमुळे  जनता पुर्णतः हतबल आहे. वारंवार न. प . ला. अवगत करून सुद्धा प्रशासन कार्यात सुधारणा नाही जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. नप प्रशासन मात्र डोळेझाक करीत असल्याने या संदर्भात विविध मागण्याचे निवेदन चिमूर शहर काँग्रेसच्या वतीने मा .उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे.
     या निवेदनात चिमूर शहराची आठवडी बाजाराची जागा निश्चित करावी, नळ पाईप लाईन खोदकाम मुळे जनतेला त्रास होत असल्याने व्यवस्था करावी,नप ला अंगणवाड्या हस्तातरीत करण्यात याव्या,नप हद्दीतील ग्रामीण भागात नागरिक योजना वंचित रहावे लागत आहे, जीप पस योजना नप हद्दीत राबविण्यात याव्या,वडाळा पैकु ग्राम पंचायत चे दस्तऐवज हस्तातरित करण्यास आदेश द्यावे, शहरातील फोडलेल्या नाल्या दुरस्त कराव्या,पंतप्रधान आवास योजनेचा तिसरा हप्ता द्यावा,नप हद्दीत परिसरात उद्याने करण्यात यावे, मेन रोड वर सुलभ शौचालय करण्यात यावे,नप मध्ये आकुती बंध कर्मचारी नियुक्त करावे, रोजंदारी कर्मचारी यांना कायमचे सेवेत रुजू करावे, एम एस ई बी ने शेतकऱ्यांना पूर्ण वेळ विद्युत पुरवठादार करण्यात यावा,नप हद्दीत अतिक्रमण धारकांना पट्टे देण्यात यावे, नप हद्दीत प्रत्येक प्रभागात विद्युत पोल उभे करून आहे.परंतु लाईट लावले नाही म्हणून तात्काळ लाईट लावण्यात यावे, शहरात मोकाट जनावरे, डुक्कर , कुत्रे , गाई बैल व इत्यादी यांचा बदोबत करण्यात यावे  यावा, शहर मुख्य रस्त्यावरील डीवायडरवर दोन्ही बाजूला रेलिंग लावण्यात यावी. असे अनेक मागण्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदन देत असताना पप्पुभाई शेख , बोभाटे,  राजू चौधरी, विलास डांगे ,  अमोल जुनघरे . लांजेवार , श्रीकांत गेडाम,अभिजित बुरुले, प्रीती दिडमुठे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत