Top News

शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस वृक्षारोपण व फळवाटप करून साजरा #chimur


चिमूर:- इर्षावाडी येथे दरड कोसळल्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते त्यामुळे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख. शिवसेना पक्ष प्रमुख. माजी मुख्यमंत्री. सन्माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वाढिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे आज उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ आनंद किन्नाके यांचे प्रमुख उस्थितीमध्ये वृक्षारोपण करून ऋग्नाना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे सरपंच प्रशांत कोल्हे. शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते. नितीन लोणारे. संजय वांकडे. तालुका संघटक रोशन जुमडे. युवासेना तालुका अधिकारी शार्दुल पचारे. निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर निवटे. बालू मेश्राम. समीर बल्की. समीर आडे. अजय मसराम उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने