Top News

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनी नाही केले ध्वजारोहन #chandrapur #sindewahi


सिंदेवाही:- तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत 1 मे 2023 ला शासनाचे आदेश असून सुद्धा ध्वजारोहण न करण्याचा प्रकार उघडकीस आला.त्या बाबतीत दै.सुवर्ण महाराष्ट्र या वृतपत्रात वृत्त सुद्धा प्रकाशित झाले.तेव्हा संबधितांची पोलखोल जनतेच्या निदर्शनास आली.मात्र याकडे एक भारत देशाचा देश प्रेमी नागरिक म्हणून एकानेही गांभीर्याने घेतलं नाही.उलट या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून व उडवाउडवीची उत्तरे देऊन संबधित अधिकारी वेळकाढूपणा करित होते.पण सिंदेवाही तालुक्यातील एका नागरिकाने देशाची अमिस्ता असलेले राष्ट्रीय ध्वज हा शासनाचे आदेश असूनही न फडकवणे हे कृत्य एक प्रकारे अवमान केल्यासारखे वारंवार वाटत होते.एक भारतीय सुजाण नागरिकाची उणीव भासवत होते.त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्याकरिता वरिष्ठांकडे तक्रार करून या प्रकरणाला योग्य तो न्याय मिळावा.यासाठी ते प्रयत्नशील होते.अखेर या प्रयत्नाला जिल्हाधिकारी कार्यालयातून योग्य त्या न्यायाचे आदेश प्राप्त झाले.ते असे कि 1 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापना दिनी ध्वजारोहण न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शास्तीची व शिस्तभंगाची कारवाई करून त्यांच्या सेवापुस्तकात नोंद करण्याचे आदेशीत केले आहे.त्यामुळे संबंधितांना चांगलीच चपराक बसली आहे.असे प्रकरण हे राज्यातले प्रथम असल्याचे वर्तविले जात आहे.त्यामुळे या न्यायदानाचं कौतुक सर्वत्र होत आहे.

 सविस्तर वृत्त असे कि,महाराष्ट्र राज्य स्थापना दिनी सिंदेवाही तालुक्यातील ग्रा.पं.कार्यालयात ध्वजारोहन न झाल्याची बातमी प्रकाशित होताच गट विकास अधिकाऱ्यांनी थातूर मातुर कारवाई म्हणून संबधितांना कारणे दाखवा नोटीस बजावली.त्यानंतर त्यांनी आपला अहवाल सादर केला त्यात त्यांनी ग्रा.पं.कार्यालयात ध्वजारोहण न केल्याचे मान्य सुद्धा केले आहे.त्यावर गट विकास अधिकारी यांनी पाठीराखण करत सक्त ताकीद दिली.पुढील कारवाई साठी अहवाल हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे पाठविण्यात आला.मात्र त्यांचेकडून कारवाई शून्य झाली.तेव्हा संबंधित व्यक्तीने गप्प न बसता थेट जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करून त्यांच्या निदर्शनास आणून दिले.व त्यावर जिल्हाधिकारी यांचे कार्यालयातून संबंधितांवर कर्तव्यात कसूर् केल्याने शिस्तभंगाची व शास्तीची कारवाई करून सेवा पुस्तिकेत नोंद करण्याचे आदेशीत केले आहे.हि कारवाई सिंदेवाही तालुक्यातील कार्यरत सर्व ग्रामसेवकांवर होणार असून त्यात संबंधित वरिष्ठावर सुद्धा होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने