Top News

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व फळवाटप

ग्रामीण रुग्णालयातील भरती असल्येल्या चिमुकल्या बाळाच्या हस्ते केक कापून केला गेला वाढदिवस साजरा 

पोंभूर्णा युवासेना तर्फे घेण्यात आले विविधकार्यक्रम 
पोंभूर्णा:- महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हा विचार घेऊन युवासेना शहर पोंभूर्णा तर्फे शिवसेना तालुका प्रमुख आशिषभाऊ कावटवार यांच्या मार्गदर्शनात व युवासेना शहर प्रमुख महेश श्रीगिरीवार यांच्या नेतृत्वात शहरातील शासकीय कार्यालयात वृक्ष रोपण व ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले.


युवासेनेचे कार्यकर्ते एकत्र येत वाढदिवसानिमित्त तहसील कार्यालय,पोलीस स्टेशन,ग्रामीण रुग्णालय,कृषी उत्पन्न बाजार समिती,वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या आवारात वृक्ष रोपण करण्यात आले. तर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे, बिस्कीट वाटप करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या चिमुकल्या बाळाच्या हाताने डॉक्टर,नर्स,कर्मचारी युवासेनेचे कार्यकर्ते एकत्र येत केक कापून माजी मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज गाधाते,ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर,अनिकेत गेडाम, सामाजिक कार्यकर्ते डॉ.राकेश गावतुरे उपस्थित होते. 
युवासेनेचे कार्यकर्ते अक्षय सोनुले, अंकुश गव्हारे,नोकेश कपाट सुरज कावडे,सुधीर ढोले,राहुल शेडमाके,विकास गुरूनुले,गौरव गुरूनुले,आकाश निखोडे,प्रकाश कांनपेलीवार,सूरज गुरुनुले,चेतन उराडे,मनीष कोपावार,गंगाधर डोनेवार, जावेद कुरेशी,अक्षय मंकीवार,राकेश मोंगरकर,महेश धोडरे ,निखिल कोसरे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने